IPL 2022, SRH : सनराइजर्स हैदराबाद (SRH) संघाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना पंजाबविरोधात होणार आहे. 22 मे रोजी हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. या सामन्यापूर्वी हैदराबादचा नियमीत कर्णधार केन विल्यमसन मायदेशी परतलाय. केन विल्यमसन साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. त्यामुळे विल्यमसनच्या अनुपस्थितीत हैदराबादची धुरा कोण सांभाळणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आलेय. सोशल मीडियावर अनेक नावांची चर्चा रंगत आहे. पण यासाठी तीन जणांची नावे चर्चेत आहेत. या तिन्हीपैकी एक जण अखेरच्या सामन्यात हैदराबाद संघाचे नेतृत्व करु शकतो.
भुवनेश्वर कुमार
विल्यमसनच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हैदराबाद संघाने नेतृत्व करु शकतो. याआधीही भुवनेश्वर कुमारने हैदराबादची धुरा सांभाळली आहे. त्याशिवाय मागील काही हंगामासाठी तो हैदराबाद संघाचा सदस्य आहे. तगड्या अनुभवामुळे भुवनेश्वर कुमार कर्णधारपदाच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 145 सामन्यात 154 विकेट घेतल्या आहेत.
निकोलस पूरन -
भुवनेश्वर कुमारनंतर निकोलस पूरन कर्णधारपदाच्या शर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने कर्णधारपद सोडल्यानंतर वेस्ट विंडिजच्या संघाचे नेतृत्व निकोलस पूरनकडे सोपवण्यात आले होते. पूरनने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. 13 सामन्यात 43 च्या सरासरीने 301 धावा कुटल्या आहेत.
एडन मारक्रम -
एडन मारक्रमने याआधी दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. अंडर 19 विश्वचषक जिंकणारा मारक्रम दक्षिण आफ्रिकाचा एकमेव कर्णधार आहे. 2014 मध्ये मार्करमने अंडर 19 सामन्यात विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या हंगामात मार्करमने 13 सामन्यात 360 धावा केल्यात.
हैदराबादचा पुढील सामना पंजाबशी -
हैदराबाद संघाचा पुढील सामना पंजाब किंग्सशी रविवारी 22 मे रोजी होणार आहे. या सामन्यात संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दरम्यान यावेळी संघाचा कर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाऊ शकते. संघातील एक वरिष्ठ खेळाडू असून त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे भुवनेश्वरकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते.