RCB vs GT, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज ऱॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. पण दुसरीकडे बंगळुरु संघ मात्र अजूनही खालच्या स्थानांवर असल्याने त्यांना आज एका मोठ्या विजयाची अत्यंत गरज आहे. गुणतालिकेचा विचार करता गुजरात टायटन्सने 13 पैकी 10 सामने जिंकत 20 गुण मिळवले आहेत. तर बंगळुरुच्या संघाने 13 पैकी 7 सामने जिंकल्याने त्यांच्या खात्यावर 14 गुणच आहेत. त्यामुळे आज बंगळुरुचा संघ विजयासाठी सर्व शक्य प्रयत्न करेल पण बलाढ्य गुजरातला ते मात देऊ शकतील का? हे पाहावे लागेल. त्यामुळे आजचा सामना नक्कीच अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
बंगळुरु विरुद्ध गुजरात अशी असेल ड्रीम 11 (RCB vs GT Best Dream 11)
विकेटकीपर- दिनेश कार्तिक, रिद्धिमान साहा
फलंदाज- फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, शुभमन गिल, रजत पाटीदार
ऑलराउंडर- ग्लेन मॅक्सवेल, हार्दिक पांड्या
गोलंदाज- वानिंदू हसरंगा, राशिद खान, मोहम्मद शमी
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळच्या सुमारास असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये दवाची अडचण येऊ शकते. म्हणूनच नाणफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- Kane Williamson On Umran Malik: उमरान मलिकबद्दल हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचं मोठं वक्तव्य
- IPL 2022: हैदराबादचा 'हा' स्टार फलंदाज लवकरच टीम इंडियात दिसणार, रवी शास्त्रींची भविष्यवाणी
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धही मुंबई पराभूत, खराब प्रदर्शनानंतर कर्णधार रोहितनं सांगतिला 'फ्यूचर प्लॅन'