IPL 2022 : राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान परागला आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत मोठी कामगिरी करता आली नाही. गुरुवारी गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यात रियानला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रियान फक्त 18 धावा काढून बाद झाला. त्याआधी झालोल्या लखनौविरोधातही रियानला फक्त 8 धावाच काढता आल्या. यंदाच्य़ा हंगामातील पहिल्या सामन्यात रियान फक्त 12 धावा काढून बाद झाला होता. मुंबईविरोघात रियान फक्त पाच धावा काढून तंबूत परतला होता. आरसीबी विरोधात रियानला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

  रियान परागच्या फ्लॉप कामगिरीमुळे राजस्थानचे चाहते चांगलेच भडकले आहेत. नेटकऱ्यांनी रियानला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर रियानच्या डान्सचीही चर्चा सुरु आहे.  


गुरुवारी झालेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फंलदाजी करताना 193 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. या सामन्यात रियान सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. रियान परागने 16 चेंडूचा सामना करताना फक्त 18 धावांची खेळी केली. त्यामुळे नेटकऱ्यांना राग अनावर आला. सोशल मीडियावर रियानला ट्रोल करण्यात आले. इतक्या संधी देऊनही रियान का खेळत नाही? असा सवाल राजस्थानच्या चाहत्यांना पडला आहे. 


पाहा मिम्स


 


























IPL 2022, RR vs GT : कर्णधार हार्दिक पांड्याच्या वादळी अर्धशतकानंतर लॉकी फर्गुसन आणि यश दयाल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. पाच सामन्यात गुजरातचा हा चौथा विजय आहे. 193 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थान संघाला निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांपर्यंत रोखलं. गुजरातकडून पदार्पणवीर यश दयाल याने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्गुसन याने भेदक मारा करत राजस्थानच्या तीन गड्यांना तंबूत झाडले. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 


राजस्थानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो - 
गुजरातने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर देवदत्त पडिकल बाद झाला. पडिकलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पडिकल फक्त शून्य धावसंख्येवर बाद झाला.  पडिकलनंतर अश्विन (8), कर्णधार संजू सॅमसन (11), सॅसी वॅन डुसेन (6) हे स्वस्तात माघारी परतले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसरीकडे जोस बटलर याने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरने 24 चेंडूत 54 धावांची विस्फोटक खेळी केली. बटलरने 24 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने तीन षटकार आणि 8 चौकार लगावले. बटलरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.  रियान पराग (18) आणि शिमरॉन हेटमायर (29) यांचेही प्रयत्न अपुरे पडले.