DD vs RR: आयपीएल 2022 च्या 34 व्या सामन्यात राजस्थान आणि दिल्ली (Rajasthan Royals Vs Delhi Capitals) एकमेकांच्या समोर आले. या सामन्यात राजस्थानच्या संघानं दिल्लीचा 15 धावांनी पराभव केला. या हाय व्होल्टेज सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलं.पंचांनी नो बॉल न दिल्यानं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) संतापल्याचं पाहायला मिळालं. एवढेच नव्हेतर तर, त्यानं  क्रीजवर उपस्थित फलंदाजांना परत बोलावण्याचा इशारा केला. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


अखेरच्या षटकात नेमकं काय घडंल?
या सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ-



राजस्थानची आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर जोस बटलरच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर 223 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीनं 20 षटकात केवळ 207 धावा केल्या. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं हा सामना 15 धावांनी जिंकला. या विजयासह राजस्थानच्या संघानं 2 गुण प्राप्त करून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. राजस्थान व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचेही 10-10 गुण आहेत. परंतु, चांगल्या नेट रनरेटमुळे राजस्थान त्यांच्यापेक्षा पुढे आहे.


हे देखील वाचा-