KKR vs GT : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघामध्ये सामना पार पडणार आहे. गुजरातने यंदाच्या हंगामात अतिशय दमदार अशी कामगिरी करत सहा पैकी पाच सामने जिंकत एकूण दहा गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघ मात्र सात पैकी तीन सामनेच जिंकला असून चार सामने गमावल्यामुळे सातव्या स्थानावर आहे.


केकेआरने गमावलेले काही सामने अतिशय चुरशीचे झाले. त्यांनी या सामन्यांमध्ये अप्रतिम असा खेळ दाखवला होता. त्यामुळे त्याचं आव्हान गुजरातसाठी नक्कीच अवघड असणार आहे. आज होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) या सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते. कारण गुजरातने यंदा दमदार खेळी करत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर केकेआर गुणतालिकेत सातव्या स्थानी असले तरी त्यांनी दाखवलेला खेळ अप्रतिम आहे.  


कधी आहे सामना?


आज 23 एप्रिल रोजी होणारा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-