RR Vs DC: राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत क्रीजवर उपस्थित फलंदाजांना परत बोलावण्याचा इशारा केला. त्याचवेळी दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही (Shardul Thakur) आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला. एवढेच नाही तर, दिल्लीचे फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आम्रेंनी (Pravin Amre) कर्णधाराच्या सांगण्यावरून मैदानात जाऊन अंपायरशी वाद घालताना दिसले. ज्यामुळं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं या तिघांना दंड ठोठावला आहे. 



दरम्यान, आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण आमरेंना दंड ठोठवण्यात आला आहे.  ऋषभ पंतला त्याच्या मॅच फीच्या 100% आणि शार्दुल ठाकूरला त्याच्या मॅच फीच्या 50% दंड ठोठवण्यात आला आहे. तर, प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे.


व्हिडिओ-



नेमकं काय घडलं?
या सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला.तसेच कर्णधाराच्या सांगण्यावरून प्रवीण आम्रेंनी  मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला.


हे देखील वाचा-