IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात धीमी झाली. तसेच सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूत कर्णधार रोहित शर्मानं त्याची विकेट गमावली. दरम्यान, फलंदाजी करण्यासाठी आलेला डेवाल्ड ब्रेविसलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वानिंदु हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानं 11 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादवनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु, दहाव्या षटकात ईशान किशनही बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि पोलार्ड शून्यावर बाद होऊन माघारी परतले. रमनदीप सिंहलाही (6 धावा) या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर सुर्यकुमार यादवनं उनादकटला सोबत संघाची धावसंख्या 151 धावांवर पोहचवली. बंगळुरूकडून वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, आकाश दीपला एक विकेट्स मिळाली.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूकडून मैदानात उतरलेल्या फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावतनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूत फाफ डू प्लेसिसनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट आणि अनुज रावतनं चांगली फलंदाजी करत संघाचा शंभर पार पोहचवला. मात्र, सोळाव्या षटकातील पाचव्या चेंडूत रावत रनआऊट झाला. त्यानं 47 चेंडूत 66 धावा केल्या. त्यानंतर आठराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीही बाद झाला. त्यानं 36 चेंडूत 48 धावा केल्या. दरम्यान, दिनेश कार्तिकनं 7 आणि ग्लेन मॅक्सवेलनं 8 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकडून डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकटनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
हे देखील वाचा-
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Maharashtra Kesari 2022 : तब्बल दोन दशकानंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरकडे, अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटील विजयी
- IPL 2022, CSK vs SRH Result : चेन्नईचा सलग चौथा पराभव, हैदराबादने 8 विकेट्सनी मिळवला विजय