IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनच्या पहिल्याच सामन्यात दमदार अॅक्शन पाहायला मिळालं. चेन्नईचा निम्मा संघ 61 धावांवर तंबूत परतल्यानंतर धोनीने कर्णधार जाडेजासोबत मिळून संघाचा डाव सावरला. ज्यामुळे चेन्नईने किमान 131 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता केकेआरला (CSK vs KKR) विजयासाठी 132 धावांची गरज आहे.


सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरले. पण केकेआरच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी करत सामन्यात दबदबा राखला. अनुभवी उमेश यादवने पहिले दोन महत्त्वाचे विकेट घेत सामन्यात संघाला आघाडी मिळवून दिली. ऋतुराज शून्यावर, कॉन्वे 3 धावा करुन बाद झाल्यानंतर उथप्पा आणि रायडूने डाव काहीसा सावरला. पण उथप्पा 28 आणि रायडू 15 धावा करुन बाद झाले. दुबेही 3 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर जाडेजा आणि धोनी यांनी संघाचा डाव सावरला. धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 तर जाडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावा झळकावत स्कोरबोर्डवर 131 धावा लावल्य़ा. ज्यामुळे आता केकेआरला विजयासाठी 132 धावांची गरज आहे.


 


चेन्नईचे अंतिम 11


डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथाप्पा, रवींद्र जाडेजा, एम एस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने. 


कोलकाता अंतिम 11


वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha