IPL 2022: आयपीएलच्या 15व्या हंगामातील मेगा ऑक्शनसाठी (IPL Mega Auction 2022) फक्त 8 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. आयपीएल 2022 साठी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये खेळांडूवर पैशाचा पडणार आहे. उत्कृष्ट खेळाडूंना खरेदी करण्यासाठी प्रत्येक फ्रंचायझी जोर लावताना दिसणार आहे. याचदरम्यान, युवा खेळाडू चेतन सकारियानं (Chetan Sakariya) आयपीएलच्या पुढील हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात सीएसकेकडून (CSK) खेळण्याची इच्छा व्यक्त केलीय. 


सकारिया म्हणाला की,  "महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचं आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचं कदाचित प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असेल. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचं माझंही स्वप्न आहे. मलाही धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली तर, नक्की आवडेल. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक गोलंदाज तयार झाले आहेत. मलाही त्याचा फायदा होऊ शकतो."


त्यावेळी साकारियानं त्याच्या आयपीएल पदार्पणावरही भाष्य केलं. "जेव्हा मी राजस्थानच्या संघात होतो, तेव्हा मला वाटलं नव्हत इतक्या लवकर मला संधी मिळेल. पण एका सामन्यापूर्वी कर्णधार संजू सॅमसननं मला फोन करून तू खेळणार असल्याचं सांगितलं. गोलंदाजी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेही सांगितलं होतं. त्या खास क्षणानंतर मी सामन्याबद्दल गंभीर झालो."


चेतन साकारियाला राजस्थान रॉयल्सनं गेल्या वर्षी 1.2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्यानं चांगली गोलंदाजी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते. त्यानं एकूण 14 विकेट घेतल्या होत्या.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha