Yash Dhull: आयसीसी अंडर-19 विश्वचषकात कर्णधार यश धुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चांगली कामगिरी केलीय. भारतानं काल (2 फेब्रुवारी) उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 96 धावांनी विजय मिळवून अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. येत्या 5 फेब्रुवारीला भारतीय संघ इंग्लडशी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. परंतु, भारतीय संघाची कमान संभाळणाऱ्या यश धुल नेमका कोण आहे? भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधारापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागलाय? त्याच्या यशामागं कोण आहे? याबद्दल जाणून घेऊयात. 


आयसीसी अंडर-19 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी धुलनं एका वेबसाईटशी संवाद साधला होता. त्यावेळी् त्यानं अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. याचबरोबर यशनं आपल्या कुटुंबियाच्या योगदानाचाही उल्लेख केला होता. "मला फार काही आठवत नाही. पण मी खूप लहान असताना माझ्यासाठी कुटुंबाला कठीण काळातून जावं लागलं होतं. असं यशनं म्हटलं होतं."


यशचे वडील विजय धूल यांनी आपल्या मुलाचे क्रिकेट करिअर घडवण्यासाठी नोकरी सोडली. सैन्यात असलेल्या विजय यांच्या वडिलांच्या पेन्शनमुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या मुलाला उत्कृष्ट क्रिकेटपटू बनण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना विजय यांनी टाईम्स ऑफ इंडियानं सांगितलं होतं की, "यशला लहानपणापासूनच खेळण्यासाठी सर्वोत्तम किट आणि गियर मिळतील, याची आम्ही काळजी घेतली. मी त्याला सर्वोत्तम इंग्रजी विलो बॅट्स दिल्या. त्याच्याकडे फक्त एकच बॅट नव्हती. मी बॅट अपग्रेड करत राहिलो आणि आम्ही आमच्या खर्चात कपात केली", असं यशच्या वडिलांनी म्हटलं होतं.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha