BCCI : आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामाची सांगता यंदा दणक्यात पार पडणार असून बीसीसीआय़ याबाबत मोठा प्लॅन आखत असल्याचं समोर आलं आहे. क्रिकेटचा उत्सव असणाऱ्या आयपीएलला मागील काही वर्षात कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात साजरं करता येत नाहीये. यंदा भारतात सामने होत असले तरी मर्यादीत प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने पार पडत आहेत. पण आता आयपीएल 2022 च्या क्लोजिंग सेरेमनी अर्थात सांगता समारंभाला (IPL 2022 Closing Ceremony) मोठ्या उत्साहात पार पाडण्याची प्लॅनिंग बीसीसीआय (BCCI) करत असून यासाठी विविध इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याकडून कार्यक्रम घेण्यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी बीसीसीआय कंपन्यांना बोली लावण्याची संधी देण्यात आली आहे.
या भव्य कार्यक्रमाचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी कंपन्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. यासाठी एक आरपीएफ (RPF) म्हणजेच रिक्वेस्ट फॉर प्रपोजल बीसीआयकडे द्यावे लागणार आहे. सोबतच एक लाख रुपयांची नॉन रिफन्डेबल रक्कम भरावी लागणार आहे. ज्यानंतर लिलाव प्रक्रियेत कंपनी भाग घेऊ शकेत. यासाठी सविस्त सर्व माहिती खालील ट्वीटमध्ये बीसीसीआयने दिली आहे.
फायनल अहमदाबादमध्ये?
लीग सामने मुंबई आणि पुण्यातील चार स्टेडिअममध्ये सुरु आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे एकाच ठिकाणी सामने आयोजित करण्यात आले आहेत. पण आता देशातील कोरोनाचा विळखा हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने लखनौ आणि अहमदाबाद येथील मैदानावर होण्याची शक्यता आहे. यावर आयपीएलची कमिटी विचार करत आहे. प्लेऑफ, एलिमनेटर आणि फायनलचा थरार या मैदानावर होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे उर्वरित सामने महाराष्ट्राबाहेर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये अहमदाबाद आणि लखनौच्या मैदानाची जोरदार चर्चा सुरु आहे. BCCI चा एका अधिकारीने स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइड स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेतला जाणार आहे. अनेक ठिकाणाचा विचार केला जात आहे. सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे, ही आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे. त्यामुळे पुढील आठवड्यांपर्यंत मैदान ठरवले जाणार आहे. याबाबतची लवकरच घोषणा केली जाईल.
हे देखील वाचा-