IPL 2022 Marathi News : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या कार कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर अजिंक्य रहाणेनं नवीन कार खरेदी केली आहे. अजिंक्य रहाणे यंदा कोलकाता संघाचे प्रतिनिधित्व करत होता. अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता संघाचे साखळी फेरीतील आव्हान संपुष्टात आलेय. त्यामुळे सर्व खेळाडू बायो बबलमधून बाहेर गेले आहेत. अजिंक्य राहणेही बायो बबलमधून बाहेर आला असून नवीन कार घेतली आहे. कोलकाता संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी खास राहिली नाही, रहाणेलाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेला प्लेईंग ११ मधून वगळण्यातही आले होते. 


रहाणेनं कोणती कार घेतली, किंमत किती?-
बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर अजिंक्य रहाणेनं  BMW Car च्या सीरीज 6 चा मॉडल खरेदी केला आहे. अजिंक्यने 630i M Sport व्हेरियंट खरेदी केला आहे. अजिंक्य रहाणेची ही स्पोर्ट्स कार पांढऱ्या रंगाची आहे. या गाडीची एक्सशो रुम किंमत 70 लाख रुपये आहे. ही गाडी गेल्यावर्षी लाँच करण्यात आली होती. अजिंक्य रहाणेकडे एकापेक्षा भन्नाट गाड्यांचे कलेक्शन आबे. अजिंक्य रहाणेकडे Audi Q5 ही गाडी आहे. अनेक भारतीय खेळाडूंकडे बीएमडब्ल्यू सीरीज 6 कार आहे. पृथ्वी शॉने गतवर्षी BMW 630i M Sport कार खरेदी केली आहे. 


यंदाच्या हंगामात रहाणेची कामगिरी निराशाजनक -
आयपीएल 2022 च्या आधी झालेल्या मेगा लिलावात कोलकाताने अजिंक्य रहाणेला एक कोटी रुपयांत खरेदी केले होते. याआधी 2021 मध्ये अजिंक्य रहाणे दिल्ली संघाकडून खेळत होता. यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणेला सलामीची भूमिका देण्यात आली. पण अजिंक्यला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अजिंक्य रहाणेला संघाबाहेरही बसवण्यात आले होते. यंदाच्या हंगाात रहाणेने सात सामन्यात 103.90 च्या स्ट्राइक रेटने 133 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणेलाही एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याची सर्वेच्च धावसंख्या 44 धावा आहे. अजिंक्य रहाणेनं यंदाच्या हंगामात 14 चौकार आणि चार षटकार मारले आहेत.