SRH vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील रविवारी झालेल्या पंजाब विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पूर आला आहे. हा लीग सामन्यातील अखेरचा सामना होता, त्यात दोन्ही संघाचं आव्हान संपुष्टात आलं असल्याने हा सामना केवळ औपचारिकता होता. त्यामुळे सामन्यानंतर बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  


या सामन्यात पुन्हा एकदा पंजाबचा कर्णधार मयांक अगरवाल (Mayank Agarwal) खराब प्रदर्शनामुले फ्लॉप ठरला. पण लियामच्या तुफानी खेळीमुळे पंजाब 5 विकेट्सनी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. दरम्यान उमराने या सामन्यातही तुफान गोलंदाजी केली. या साऱ्यासंबधी अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील काही मजेशीर मीम्म पाहूया... 










पंजाबचा हैदराबादवर पाच विकेट्सनं विजय


सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सायंकाळी असून देखील हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाची अडचण येण्याची शक्यता असतानाही हैदराबादने हा निर्णय घेतला यामागील कारण एक मोठी धावसंख्या उभी करुन पंजाबवर दबाव आणणं हे असू शकतं. पण पंजाबच्या तुफान गोलंदाजीमुळे हे हैदराबादला करता आलं नाही. त्यांच्याकडून फलंदाजांनी अतिशय सुमार फलंदाजी केल्यामुळे संघा 20 षटकात 8 विकेट्सच्या बदल्यात 157 धावाच करु शकला. ज्यामुळे आता विजयासाठी पंजाबला 158 धावांची गरज आहे.  यावेळी हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावा केल्या. 


ज्यानंतर हैदराबादने दिलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाने सुरुवातीपासून दमदार खेळी केली. बेअरस्टो आणि धवनने चांगली भागिदारी केली. 23 धावा करुन बेअरस्टो बाद झाला. शिखर मात्र टिकून होता. शाहरुखने आणि जितेश यांनी प्रत्येकी 19 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान लियाम याने मात्र अत्यंत तुफान खेळी केली. त्याने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. यावेळी 2 चौकार आणि 5 षटकार त्याने ठोकले. ज्यामुळे पंजाबने 15.1 षटकातचं आव्हान पार करत स्पर्धेचा शेवट गोड केला. 


हे देखील वाचा-