1000 Sixes in IPL 2022: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याच्या समाप्तीसह आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील साखळी सामन्यांचा शेवट झाला. या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा पाच विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादविरुद्ध पंजाब सामन्यात एकूण 15 षटकार लागले. या षटकारांमुळं आयपीएलमध्ये नवा पराक्रम घडला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हंगामात 1000 षटकार लागले आहेत. यापूर्वी 2018 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम घडला होता. त्यावेळी एकूण 872 षटकार मारले गेले होते.
आयपीएल 2022 मध्ये जोस बटलरच्या नावावर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील साखळी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. जोस बटलरनं 14 सामन्यात 37 षटकार ठोकले आहेत. जोस बटलरनंतर या यादीत लियाम लिव्हिंगस्टोन, आंद्रे रसंल, केएल राहुल आणि रोव्हमन पॉवेल यांच्या नावांचा समावेश आहे.
आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी-
क्रमांक | खेळाडूंचं नाव | एकूण षटकार |
1 | जोस बटलर | 37 |
2 | लियाम लिव्हिंगस्टोन | 34 |
3 | आंद्रे रसल | 32 |
4 | केएल राहुल | 25 |
5 | रॉवमेन पॉवेल | 22 |
पंजाबचा हैदराबादवर पाच विकेट्सनं विजय
यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 70 व्या सामन्यात पंजाब किंग्स संघानं सनरायजर्स हैदराबादवर (PBKS vs SRH) 5 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादनं 158 धावांचं माफक आव्हान पंजाबला दिलं.मपण लियाम लिव्हिंगस्टोनच्या तुफानी खेळीच्या जोरावर हे आव्हान 15.1 षटकातचं पूर्ण केलं.
हे देखील वाचा-