IPL 2022 : मुंबई इंडियन्स संघ म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ. तब्बल 5 वेळा आय़पीएलची ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई संघाला यंदा मात्र काहीच खास कामगिरी करता आलेली नाही. मुंबईचा संघ यंदा 14 पैकी तब्बल 10 सामने गमावत दहाव्या स्थानावर राहिला. दरम्यान यंदाचा महालिलाव संघासाठी खास ठरला नसल्याचं दिसून आलं. याआधीही काही दमदार खेळाडूंना मुंबई संघाने गमावलं आहे. बराच काळ संघात राहूनही त्यांना संधी मिळाली नाही. पण आता हेच खेळाडू इतर संघातून धमाल कामगिरी करत आहे. यातील काही खेळाडूंवर नजर फिरवू...


जितेश शर्मा 


यंदाच्या हंगामात पंजाबकडून या जितेश शर्माने त्यांच्या फलंदाजीने बऱ्याच जणांची मनं जिंकली. त्याने यंदा 11 सामन्यात खेळत 158 च्या स्ट्राईक रेटने 215 धावा केल्या. तर हाच जितेश आयपीएल 2016 आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. पण त्याला संधीच मिळाली नाही.


मोहसिन खान


यंदाच्या हंगामात चमकलेला आणखी एक युवा खेळाडू म्हणजे गोलंदाज मोहसिन खान. लखनौ सुपरजांट्सकडून केवळ 8 सामने खेळत 5.93 च्या इकोनॉमीने 13 विकेट्स खानने घेतल्या. दरम्यान खान याआधी 2018 आणि 2020 मध्ये मुंबई संघात होता.


निकोलस पूरन


आयपीएलमधील एक स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध निकोलस पूरनला 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केलं होतं. यावर्षी मुंबईने ट्रॉफीही जिंकली होती. पण पूरनला संघात स्थान मिळालं नव्हतं. पण 2019 मध्ये पूरनने पंजाब संघात डेब्यू केला. त्यानंतर यंदा तो हैदराबाद संघात आहे. त्याने यंदा 149 च्या स्ट्राईक रेटने 43 च्या सरासरीने 301 धावा केल्या.


कुलदीप यादव


अनेकांना हे माहित नसेल की टीम इंडियाचा चायनामन बोलर कुलदीप यादव हा ही आयपीएलमध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्समध्ये उतरला होता.त्याला पण मुंबई संघाने संधी दिली नव्हती. ज्यानंतर तो केकेआरमध्ये आणि आत दिल्ली संघात खेळताना दिसला.


अक्षर पटेल 


दिल्लीचा आणखी एक स्टार खेळाडू अक्षर पटेल मागील काही वर्षात दमदार कामगिरीमुळे चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. तो ही एकेकाळी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण मुंबईने त्याला रिटेन केलं नाही. त्यानंतर पंजाबकडून त्याने डेब्यू केला. यंदा तो दिल्ली संघात होता. 


हे देखील वाचा-