IPL 2021 : काहीच दिवसांत आयपीएलच्या उतर्वरित सामने खेळवण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेयरस्टोनं आयपीएल 14च्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्यास नकार दिला आहे. अशातच सनरायझर्स हैदराबादसाठी दिलासादायक बाब म्हणजे, त्यांना बेयरस्टोची रिप्लेसमेंट मिळाली आहे. बेयरस्टोच्या बदल्यात सनरायझर्स हैदराबादकडून वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज शेरफेन रदरफोर्डचा संघात समावेश केला आहे.
इंग्लंड क्रिकेट संघातील बेयरस्टो असा एकमेवर खेळाडू नाही, ज्यानं आयपीएल 14 च्या दुसऱ्या टप्प्यातून आपलं नाव माघारी घेतलंय, तर इतरही अनेक खेळाडूंनी आपलं नाव माघे घेतलंय. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या क्रिस वोक्स आणि पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या डेविड मलाननंही आयपीएल 14 च्या दुसऱ्या टप्प्यातून आपलं नाव मागे घेतलं आहे. भारताविरोधात मॅनचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खेळाडूंनी हा निर्णय घेतला.
एसआरएचनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेरफेन रदरफोर्डच्या टीमसोबत जोडल्या जाण्याची घोषणा केली. सनरायझर्स हैदराबादचं म्हणणं आहे की, "धडाकेबाज कॅरिबियाई आता एक रायझर आहेत. शेरफेन रदरफोर्ड आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी जॉनी बेयरस्टोच्या बदल्यात आमच्या संघात सहभागी होईल."
रदरफोर्ड फॉर्मात
शेरफेन रदरफोर्डनं कॅरेबियन लीगमध्ये उत्तम खेळी केली. रदरफोर्ड फिनिशर म्हणून आपल्या संघाला अनेक सामने जिंकून देण्यात यशस्वी ठरला. शेरफेन रदरफोर्डनं टी20 स्वरुपात 138.26 स्ट्राइक रेटनं 1102 धावा केल्या. तो 2020 मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचाही हिस्सा होता. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून एकही सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. रदरफोर्डनं 2019 मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी एकूण सात सामने खेळले आहेत. त्यानं 135.18 च्या स्ट्राईक रेटनं 73 धावा केल्या असून एक विकेटही घेतला आहे.
शेरफेन रदरफोर्ड सनरायझर्स हैदराबादसाठी पर्वणी ठरू शकतो. सनरायझर्स हैदराबादला एका अशा खेळाडूची गरज होती जो, संघासाठी फिनिशर म्हणून भूमिका निभावेल. रदरफोर्ड सनरायझर्स हैदराबादकडून पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल.