IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या अंतिम सामन्यासाठी आता जवळपास 20 दिवस बाकी आहे. अशातच आता प्लेऑफचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. शनिवारी खेळवण्यात आलेल्या डबल हेडरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. तर पंजाब किंग्सकडून झालेल्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर गेला आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं टूर्नामेंटमध्ये आपलं उत्तम प्रदर्शन केलं आहे. शनिवारी दिल्ली कॅफिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला. हा दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएलच्या 14व्या सीझनमधील 8वा विजय आहे. त्यासोबतच पॉईंट टेबलमध्ये 16 गुणांसह पहिलं स्थान काबीज केलं. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात 16 पॉईंट्स मिळवणाऱ्या सर्वच संघांना प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळाली आहे.
सनरायझर्स हैदराबादला पंजाबकडूनही पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबादला या सामन्यात पाच धावांनी पराभव स्विकारावा लागला. सनराझर्स हैदराबादनं टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. हा त्यांचा आठवा पराभव होता. सनरायझर्स हैदराबादचा नेट रन रेटही निराशाजनक होता. त्यामुळे हैदराबादला प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर जावं लागलं.
सीएसके प्लेऑफच्या जवळ
पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यात यशस्वी झाला आहे. पंजाब किंग्सनं आपल्या दहाव्या सामन्यात आपला चौथा विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. आरसीबीला आता कमीत कमी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. केकेआर, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आपल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :