RCB New Jersey : विराट कोहलीच्या बंगलोरनं आता इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनच्या इतर सामन्यांसाठी लाल ऐवजी निळ्या रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आरसीबीनं कोविड-19 विरोधातील लढाईत बंगलोर आणि इतर शहरांना 100 व्हेंटिलेटर्स आणि 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स दान करण्याची घोषणा केली आहे. गेट इंडिया फाउंडेशनसोबत एकत्र येऊन फ्रेंचायझी कोरोना संकटात अडकलेल्या शहरांना मदतीचा हात देणार आहे. 


आरसीबीनं आयपीएल 2021 च्या यापुढील सामन्यांमध्ये फ्रंट वर्कर्सना पाठिंबा देण्यासाठी लालऐवजी निळ्या जर्सीसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निळ्या जर्सीसह आरसीबीचा संघ पीपीई किट घालून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कोविड योद्ध्यांना पाठिंबा देणार आहे. तसेच नवीन रंगाची जर्सी आजारांशी लढण्यासंदर्भात जागरुकता पसरवणारा संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे. त्याचसोबत आरसीबी कोरोना संकटात मदतीसाठी पैसे एकत्र करण्यासाठी खेळाडूंच्या सह्या असलेल्या निळ्या जर्सींचा लिलावही करणार आहे. 



बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं सांगितलं की, "सध्या आपला देश कठिण प्रसंगातून जात आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जे होत आहे, ते खरंच चिंताजनक आहे. त्यामुळे ही सर्व फ्रंट लाइन वर्कर्ससाठी आहे, जे आपल्याला वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यांना वंदन करतो आणि सर्व नारिकांमध्ये कोरोना नियमांचं पालन करण्याप्रति जागरुकता पसरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही त्या सर्व गोष्टी करणार आहोत, ज्या या लढाईत लढण्यासाठी मदत करतील."


दरम्यान, गेल्या वर्षी महामारीला सुरुवात झाल्यानंतर आरसीबीची मूळ कंपनी, डियाजियो इंडियाने जवळपास 30,0000 लीटर सॅनिटायझरचा वाटप केला. तसेच आजाराविरोधातील लढाईत 75 कोटी रुपये खर्च केले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :