IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा 14 वे सत्र सुरू होण्याआधीच राजस्थान रॉयल्सला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचा सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या दौर्‍यासाठी आर्चर उपलब्ध नसल्याची माहिती इंग्लंडच्या वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली.


कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आर्चर उपचारांसाठी इंग्लंडला परतणार आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत तो सहभागी झाला होता. पण दुखापतीमुळे त्याला मालिकेत चांगरी कामगिरी करण्यात अडचण आल्याचं ईसीबीने म्हटलं आहे. त्यामुळे जोफ्रा आर्चरला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.


आर्चर इंग्लंडला परतणार
आर्चर इंग्लंडला परत येत आहे. ईसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, "बोर्डाची वैद्यकीय टीम आर्चरची देखरेख करील आणि उपचारानंतरच तो परत येईल. या कारणास्तव आर्चर आयपीएल 2021 चे सुरुवातीचे सामना खेळू शकणार नाही."


India vs England ODI Series | भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक


आर्चर आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये 18.25 च्या सरासरीने 20 विकेट घेत राजस्थानचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गननेही पाचव्या टी -20 नंतर सांगितले की, आर्चरच्या दुखापत वाढत चालली आहे, त्याला उपचारांची आवश्यकता आहे. आमच्या वैद्यकीय पथकाने या संदर्भात निर्णय घेण्याची गरज आहे."