IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर मात करत दणदणीत विजय मिळवला. शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 7 विकेट्सनी पराभव केला. परंतु, आता दिल्लीच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमीच म्हणावी लागेल. दिल्लीचा स्टार गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली आहे.  


चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ स्टार गोलंदाज इशांत शर्माशिवाय मैदानात उतरला. इशांत शर्माऐवजी आवेश खानला आवेश खानला संघात पाहून सर्वचजण हैराण झाले होते. परंतु, सामन्यानंतर इशांत शर्माला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. 


दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक कोच मोहम्मद कैफने इशांत शर्माच्या फिटनेसबाबत माहिती दिली. कैफ म्हणाला की, "इशांत शर्मा दुखापतग्रस्त आहे. जर तो फिट झाला असता, तर चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश करण्यात येणार होता. परंतु, इशांत शर्मा दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे संघात आवेश खानचा समावेश करावा लागला." 


वोक्सनं सांभाळली गोलंदाजीची कमान 


दिल्ली कॅपिटल्ससमोर पहिल्या सामन्यापूर्वी अनेक अडचणी होत्या. संघाचे मुख्य गोलंदाज रबाडा आणि नॉर्खिला यांचा क्वॉरंटाईनच्या नियमांमुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात संघात समावेश होऊ शकला नाही. पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाची कमान टीम वोक्स आणि टॉम करन यांनी सांभाळली.  दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.


धवन आणि शॉने सांभाळली दिल्लीची धुरा 


पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य 18.4 षटकांत पूर्ण केलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने 54 चेंडूंमध्ये 85 धावा केल्या. या डावात त्यांनी 10 चौकार आणि दोन षटकार लगावले. शॉने 38 चेडूंमध्ये 72 धावांची धमाकेदार खेळी केली. या दरम्यान पृथ्वीने 9 चौकार आणि तीन षटकार लगावले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने पहिल्या विकेटसाठी 13.3 ओव्हर्समध्ये 138 धावा करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने 12 चेंडूंमध्ये दोन चौकरांच्या मदतीने 15 धावा करुन नाबाद खेळी केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :