IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनमधील उर्वरित सामने दुबईत खेळवले जाणार असून सप्टेंबरमध्ये याचं आयोजन केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, बीसीसीआयच्या वतीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच धोनीच्या नेतृत्त्वाच खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टार गोलंदाज दीपक चाहरने महेंद्र सिंह धोनीबाबत मोठा दावा केला आहे. चाहरचं म्हणणं आहे की, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2021च्या उत्तरार्धात आपल्या फॉर्ममध्ये परत येऊ शकतो.


आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघानं उत्तम कामगिरी केली आहे, पण धोनी फारशी चांगली खेळी करताना दिसला नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी जाहीरपणे निराशा व्यक्त केली होती. धोनीनं आयपीएल 2021च्या पूर्वार्धातील सात सामन्यांमध्ये केवळ 37 धावा काढल्या होत्या. बायो बबलच्या कठोर नियमांमध्येही आयपीएलच्या काही संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातील आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. 


...म्हणून चांगली खेळी करु शकला नाही धोनी 


दीपक चाहरचं म्हणणं आहे की, धोनी आयपीएलच्या उत्तरार्धात परिस्थितीशी जुळवून घेईल. चाहर म्हणाला की, "एक फलंदाज एकाच प्रकारे 15 ते 20 वर्ष फलंदाजी करु शकत नाही. जर कोणत्याही फलंदाजाने आधीसारखं नियमितपणे क्रिकेट नाही खेळलं, तर आयपीएलसारख्या स्पर्धेत येऊन उत्तम खेळी करणं त्याच्यासाठी कठिण असतं. त्यामुळे त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो."


चाहरने आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी उत्तम खेळ करताना दिसणार असल्याचा दावा केला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहर म्हणाला की, "धोनीनं नेहमीच टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. फिनिशरच्या रुपात नेहमीच धोनी दिसून आला आहे. परंतु, आता ज्यावेळी तुम्ही पहिल्यासारखं दररोज क्रिकेट खेळत नसाल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 2018 आणि 2019 च्या सीझनमध्येही धोनी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फआरशी चांगली खेळी करु शकला नव्हता. पण जसंजसं सीझन पुढे गेलं, तसंतसं धीनीची धमाकेदार खेळी चाहत्यांना पाहायला मिळाली होती. त्यामुळेच कदाचित आयपीएल 2021च्या उत्तरार्धात धोनी फॉर्मात दिसून येऊ शकतो."


दरम्यान, दीपक चाहरसाठी आयपीएलच्या 14व्या सीझनच्या पूर्वार्धात उत्तम खेळी करताना दिसला आणि त्याने सात सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतले होते. दीपक चाहरच्या चांगल्या कामगिरीमुळे जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दोऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :