इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील 5वा सामना बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. या मॅचमध्ये कोलकाता नाइट राइयर्सचा फलंदाज शुभमन गिल वर सर्वात जास्त फोकस असण्याची शक्यता आहे. न्यूझिलँडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने हा दावा केला आहे.


गिलने अंडर-19, घरगुती क्रिकेट आणि मागच्या वर्षी आयपीएलमध्ये आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. स्टाइरिस म्हणाला, की "मागील 18 महिन्यांपासून गिलचा चाहता आहे. गिलच्या फॅन्समध्ये माझा नंबर पहिला असेल. कारण, गिल हा प्रतिभावान क्रिकेटर आहे.


स्टायरिसने गिलचे वर्णन केकेआरचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून केले. तो म्हणाले, "रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीरनंतर गिल वर संघाची जबाबदारी आहे. आक्रमक फलंदाजीमध्ये त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. तो कोलकाताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे."


MI Vs KKR | आंद्रे रसेलचं वादळ रोखण्यासाठी मुंबईचा खास प्लॅन; केकेआरही पहिल्या सामन्यासाठी सज्ज


स्टायरिसच्या म्हणण्यानुसार पृथ्वी शॉ आणि पेडिकलसारख्या उर्वरित युवा फलंदाजांपेक्षा गिल वर जास्त जबाबदारी आहे. तो म्हणाला, "गिलच्या खांद्यावर जास्त जबाबदारी असल्याने तो मागे राहण्याची शक्यता आहे.





शुभमन गिलने इंडियन प्रीमियर लीगच्या 11 व्या सीजनमध्ये पदार्पण केले. शुभमन गिल आतापर्यंत आयपीएलचे 27 सामने खेळला आहे. या स्टार खेळाडूने 24 डावात 33.27 च्या सरासरीने 499 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचाही समावेश आहे.


IPL 2020 Schedule | आयपीएलच्या तेराव्या मोसमातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, MI VS CSK सलामीची लढत!