MI Vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमधील पाचवा सामना आज कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा सामना करणारा संघ मुंबई इंडियन्स आयपीएलच्या या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर कोलकत्ता आज यंदाच्या सीझनमधील पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आयपीएल 2020 जिंकण्यासाठी केकेआरने काही खास बदल आपल्या संघात केले आहेत. धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेलला पहिल्या फळीत खेळवण्याचा विचार केकेआर करत असल्याचे संकेत संघाच्या वतीने देण्यात आले आहेत. तर केकेआरचं हे चक्रव्यूह भेदण्यासाठी आणि आक्रमक रसेलला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही खास प्लान तयार ठेवला आहे.


कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी रसेल आपल्यासाठी सर्वात मोठं आव्हान असल्याचं सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज बोल्टने सांगितलं की, 'सध्या आंद्रे रसेल टी20 मधील सर्वात खतरनाक फलंदाज आहे. आणि तेच आव्हान आहे. म्हणूनच मी हा खेळ खेळतो. मला मोठ्या खेळाडूंचं आव्हान स्विकारण्याची आणि त्यांचे विकेट्स घेण्याची इच्छा आहे. मी हे आव्हान स्विकारण्यासाठी तयार आहे.'





डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासंदर्भात बोलताना बोल्ट म्हणाला की, 'हे टी20मधील सर्वात मोठं आव्हान आहे. जेव्हा बॅट्समन सेट असतात, तेव्हा तुम्हाला बॉलिंग करायची असते. डु प्लेसिस त्यावेळी तंबुत माघारी परतला होता. जेव्हा सेट झालेला बॅट्समन धावा काढत असतो, त्यावेळी बचाव करणं सोपं नसतं. वैयक्तिकरित्या मी माझ्या ताकदीच्या विश्वासावर असतो. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो.'


वरच्या फळीत मैदानावर उतरू शकतो आंद्रे रसेल


कोलकत्ता नाइटरायडर्सने आधीपासूनच आंद्रे रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरू शकतो, असे संकेत दिले आहेत. याआधी रसेल पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. परंतु, उथ्थपानंतर वरच्या फळीत एक जागा रिकामी असल्यामुळे त्या जागेवर केकेआर रसेल नावाचं वादळ मैदानावर उतरवू शकते.


रसेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधित स्ट्राइक रेटसोबत फलंदाजी करणारा खेळाडू आहे. रसेलने आतापर्यंत 64 आयपीएल मॅचेस खेळल्या आहेत. त्यामध्ये 186.42च्या स्ट्राइकरेटसोबत 1400 धावा केल्या आहेत. रसेलने लीगमध्ये 55 विकेट्स आपल्या नावे केले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :