IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 10वा सामना मुंबई आणि बंगलोरमध्ये खेळवण्यात आला होता. हा सामना अत्यंत रोमांचक होता. रोहिल शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत ट्वीस्ट कायम होता. परंतु, सुपर ओव्हरमध्ये बंगलोरने बाजी मारली. संघाच्या पराभवानंतरही या सामन्यात 99 धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या इशान शर्माचाच सगळीकडे बोलबाला आहे. यंदाच्या मोसमातला आपला पहिला सामना खेळणाऱ्या ईशान शर्माने संघासाठी 99 धावा केल्या. पण आपलं शतक आणि संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. मुंबईला अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी पाच धावांची गरज असताना ईशाननं टोलावलेला चेंडू थेट डीप मिडविकेटच्या हातात विसावला. आणि ईशान माघारी परतला. संघाला विजय मिळवून देऊ न शकल्यामुळे ईशान फार निराश होता. त्यावेळचा ईशान किशनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





बंगलोरने दिलेल्या 202 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेला मुंबईचा संघ 14व्या ओव्हर पर्यंत सामना गमावणार असंच चित्र होतं. मुंबईला शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 104 धावांची गरज होती. असं वाटू लागलं होतं की, एखादा चमत्कारचं मुंबईला जिंकवू शकतो. अखेर तो चमत्कार कालच्या सामन्यात सर्वांनी पाहिला तो ईशान किशन आणि पोलार्डच्या धमाकेदार खेळीच्या रूपात.


ईशान किशन आणि कायरन पोलार्डने हार न मानता सामना जवळपास आपल्याकडे खेचूनच आणला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर फक्त दोन धावा आणि असं वाटलं आता मुंबईच्या हातून सामना निसटणार. परंतु, यंदाच्या मोसमातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या ईशान किशनने सामन्याचं रूपडंचं पालटलं. त्याने दोन चेंडूंमध्ये दोन षटकार फटकावत सामना मुंबईच्या बाजून फिरवला. पण 5व्या चेंडूवर ईशान माघारी परतला. अवघ्या एका धावेवाचून त्याचं शतक अपूर्ण राहिलं. शेवटच्या एत चेंडूत मुंबईला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असताना पोलार्डने चौकार फटकावला आणि अतितटीच्या सामना बरोबरीत संपला. त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार रंगला. सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने मुंबईला हरवलं.


शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाल्यामुळे ईशान किशन फार निराश झाला होता. किशन संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे सर्वांपासून दूर जाऊन एकटाच बसला होता. ईशान किशनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ईशान किशनने 58 चेंडूंत 99 धावा काढल्या. त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :