नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या सीझनचं आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांच्या खेळाडूंनी क्वॉरंटाईन होण्याबाबत एका महत्त्वाच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय आणि संघाचे मालक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट झालं आहे की, सर्व खेळाडू दुबईत दाखल झाल्यानंतर 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहणार आहेत. खेळाडूंच्या प्रॅक्टिससाठी आयपीएलमधील सर्व संघ आपल्या खेळाडूंसह 20 ऑगस्ट रोजी दुबईत दाखल होणर आहेत.


बैठकीनंतर सर्व संघांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, आम्हाला खेळाडूंच्या आरोग्यासोबत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. सर्व खेळाडू आणि स्टाफ दुबईत दाखल झाल्यनंतर 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन होणार आहेत.


दुबई सरकारच्या नियमानुसार, देशात दाखल होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची 96 तासांआधी कोरोना चाचणी होणं गरजेचं आहे. एवढचं नाहीतर दुबईत दाखल झाल्यानंतरही संबंधित व्यक्तीची पुन्हा एकदा चाचणी केली जाते. दरम्यान, दुबईतील प्रशासन फक्त पॉझिटिव्ह येण्याऱ्या व्यक्तींनाच 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येतं. दुबईत कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये Alhosn अॅप असणं गरजेचं आहे.


संघांमध्ये 24 खेळाडूंना घेण्याची परवानगी


बीसीसीआयने सर्व संघांसाठी एसओपी जारी केलं आहे. एसओपीमध्ये संघांमा बायोसिक्योर प्रोटोकॉलबाबत माहिती देण्यात आली आहे. संघांच्या मालकांनी बीसीसीआयच्या संघात फक्त 24 खेळाडू ठेवण्याच्या निर्णयाला परवानगी दिली आहे.


दरम्यान, यावेळी बीसीसीआय समोर टायटल स्पॉन्सर सोधण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. बीसीसीआयने गुरुवारी चीनसोबत झालेल्या तणावानंतर वीवोला टायटल स्पॉन्सर म्हणून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयला वीवो दरवर्षी टायटल स्पॉन्सर म्हणून 440 कोटी रुपये देत होतं. वीवोने बीसीसीआयसोबत 2022 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या :