IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्येही आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारा आरसीबीचा संघ आठव्यांदा आयीपीएल जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे विराट कोहलीला आरसीबीच्या कर्णधार पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. परंतु, समोर आलेल्या माहितीनुसार, आरसीबी मॅनेजमेंट संघाची धुरा विराटच्याच खांद्यावर सोपावणार आहे.


एलिमिनेटर सामन्यांत आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादकडून 6 विकेट्सनी पराभव झाला. या पराभवानंतर विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं तर विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. परंतु, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या सपोर्ट स्टाफचे प्रमुख माइक हेसन आणि कोच सायमन कॅटिच यांनी विराट कोहलीची बाजू घेत त्याला पाठिंबा दर्शवला.


कॅटिच यांनी विराट कोहलीचं संघाचा कर्णधार असेल, असं मत दर्शवलं आहे. कॅटिच यांनी सांगितलं की, 'लीडर म्हणून विराट कोहली आमच्या संघात असल्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. विराटचं आपल्या कामावर प्रेम आहे आणि खेळाडू म्हणून त्याचा सन्मान करण्यात येतो.'





कोहलीलाच दिलं यशाचं श्रेय


आयपीएल 2020 मध्ये आरसीबीच्या यशाचं श्रेय संघाचा कर्णधार विराट कोहलीला देण्यात आलं आहे. कॅटिच पुढे बोलताना म्हणाले की, 'कोहली संघ आणि युवा खेळाडू खासकरून देवदत्त पड्डीकलसोबत फार वेळ घालवतो. असं फार खेळाडूंमध्ये दिसून येत नाही. आम्ही आयपीएलमध्ये सहभागी झालो आणि शेवटपर्यंत योग्य पद्धतीने खेळलो. याचं सर्व श्रेय विराट कोहलीलाच जातं.'


कोहलीने या आयपीएलच्या 15 सामन्यांत 121.35 च्या स्ट्राइक रेटने 450 हून अधिक धावा केल्या. दरम्यान काही ओव्हर्समध्ये त्याला संघर्ष करावा लागला.


हेसन आणि कॅटिच यांनी संघाच्या गोलंदाज खेळाडूंमध्ये खासकरुन भारतीय स्पिनर युजवेंद्र चहलचं कौतुक केलं. तसेच दोघांनीही पड्डीकल, वाशिंगटन सुंदर आणि नवदीप यांसारख्या भारतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीबाबत त्यांचंही कौतुक केलं.


महत्त्वाच्या बातम्या :