इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमातील विजेता ठरविण्यासाठी आता फक्त दोन सामने शिल्लक आहेत. कोरोना संसर्गाच्या कचाट्यात खेळवल्या जाणार्‍या या स्पर्धेत चांगला खेळ पाहायला मिळाला. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आतापर्यंत ऑरेंज कॅप कायम ठेवली आहे. मात्र, अंतिम सामना झाल्यानंतर ही टोपी दुसर्‍या फलंदाजाच्या डोक्यावर जाण्याची शक्यता आहे.


13 व्या सत्रात केएल राहुलने शानदार कामगिरी करत 14 सामन्यांत 55.83 च्या सरासरीने 670 धावा केल्या. केएल राहुलने या मोसमात एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांपासून आतापर्यंत केएल राहुलने ऑरेंज कॅप कायम ठेवली आहे.


IPL 13 मधून बाहेर पडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला, 'ही' चूक महागात पडली


सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही गेल्या काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. डेव्हिड वॉर्नरने 15 सामन्यांत 42 च्या सरासरीने 546 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये आणखी एक सामना खेळणार आहे. वॉर्नरच्या संघाने क्वालिफायर दोनमध्ये दिल्लीला पराभूत करुन अंतिम तिकिट सामन्याचे मिळवले तर वॉर्नर केएल राहुलच्या डोक्याची ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर मिरवू शकतो.


गौतम गंभीरचा विराट कोहलीवर संताप, म्हणाला, कर्णधारपदावरुन हटवा!


दिल्ली कॅपिटल्सचा स्टार सलामीवीर शिखर धवनही ऑरेंज कॅप शर्यतीतआहे. शिखर धवनने 15 सामन्यांत 43.75 च्या सरासरीने 525 धावा केल्या आहेत. या मोसमात दोन शतके करणारा शिखर धवन एकमेव खेळाडू आहे.


बुमराहकडे पर्पल कॅप


टी-20 फॉर्मेटमध्ये मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 14 सामन्यांत 27 बळी मिळवून पर्पल कॅप दावा सांगितला आहे.


बुमराहला पर्पल कॅपच्या बाबतीत दिल्ली राजधानीच्या रबाडाकडून आव्हान मिळू शकेल. या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यात रबाडाने शानदार गोलंदाजी केली आणि 11 सामन्यात 24 बळी घेतले. मात्र, शेवटच्या चार सामन्यात त्याला फक्त एक विकेट मिळवता आली आहे. पर्पल कॅप शर्यतीत 25 विकेट्ससह तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 22 विकेट्ससह बोल्ट पर्पल कॅप शर्यतीत कायम आहे.