IPL 2020 : सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री घेती आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 5 विकेट्सनी पराभव केला. या पराभवासोबत मुंबईचा संघ आयपीएल 2020 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने आयपीएलच्या या सत्रात एकूण आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
बंगलोर पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
आयपीएल 2020 च्या पॉईंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोरचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. दोन्ही संघांनी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. परंतु, नेट रन रेटच्या आधारे बंगलोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुलच्या नेतृत्त्वा खेळणारा पंजाबचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या सीझनमध्ये सहा सामन्यांमध्ये सहा सामन्यांमध्ये पराभव झालेला कोलकाचा नाईट रायडर्सचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर पाच सामने जिंकत राजस्थान रॉयल्स आणि सातव्या क्रमांकावर चार सामने जिंकत सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
तरुण फलंदाजांमध्ये देवदत्त पडिक्कलने पूर्ण केल्या 400 धावा
आपला पहिला आयपीएल सीझन खेळणाऱ्या 20 वर्षांचा तरुण फलंदाज देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये 400 धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबई इंडियन्स विरोधात त्याने 74 धावांची खेळी केली. या आयपीएलमध्ये त्याने चार अर्धशतकं फटकावत 417 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. 595 धावा करणाऱ्या केएल राहुलने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे.
आयपीएलमध्ये दोन शतकं ठोकणारा शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 11 सामन्यांमध्ये आतापर्यंत दोन शतकं आणि दोन अर्धशतकं फटकावत 471 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर आहे. ज्याने 436 धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली 424 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅपसाठी रबाडा-बुमराहमध्ये टक्कर
पर्पल कॅपच्या रेसमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 23 विकेट्स घेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याने 12 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर किंग्स इलेव्हन पंजाबचा मोहम्मद शमी आहे, ज्याने 20 विकेट्स घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर आरसीबीचा स्पिनर युजवेंद्र चहल आहे, ज्याने स्पर्धेत आतापर्यंत 18 विकेट्स घेतले आहेत. पाचव्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबातचा लेग स्पिनर राशिद खान आहे, ज्याने 12 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :