मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा सीजन आजपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सीजनमधील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि मागील वर्षीचा उपविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. त्यामुळे 'शनिवार की शाम' आयपीएल आणि मुंबई-चेन्नईच्य़ा चाहत्यांसाठी खास असणार आहे.


मुंबई इंडियन्ससाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट असणं सर्वात महत्वाची आणि जमेची बाजू आहे. गेल्या वर्षात दुखापतीमुळे हार्दिक पांड्या फारच कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकला. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या स्टार खेळाडूचा एक व्हिडिओ शेअर केला.या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या सरावादरम्यान उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. नेटमधील सरावादरम्यान हार्दिक पांड्या मोठे फटके देखील लावताना दिसत आहे.





दुखापतीनंतर हार्दिकने मैदानात परतण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हार्दिकने सतत सरावादरम्यानचे फोटो शेअर केले आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर पांड्याला सतत दुखापतीशीं झगडावं लागलं आहे.


दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचं लक्ष आयपीएलचं पाचव्यांदा जेतेपदाकडे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर, धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज चौथ्यांदा विजेतेपद जोर लावणार आहे. चेन्नई आणि मुंबई संघांमधील लढत नेहमीच अटीतटीची ठरलीय. क्रिकेट फॅन्स आतूरतेने या संघामधील सामन्याची वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये 10 पैकी तब्बल आठवेळा चेन्नईनं अंतिम फेरी गाठली आहे. पण या आठपैकी केवळ तीन वेळाच विजेतेपदावर नाव कोरता आलं. पण याऊलट मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक चारवेळा विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. या चारपैकी तीन वेळा मुंबईने चेन्नईलाच अंतिम फेरीत मात दिली होती. मुंबई आणि चेन्नई संघ आयपीएलच्या मैदानात 28 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 17 वेळा मुंबईनं तर 11 वेळा चेन्नईनं विजय साजरा केला आहे.


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमधील सामना कधी आणि कुठे पाहता येईल?


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमधील सामना उद्या म्हणजे 19 सप्टेंबरला असणार आहे. अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचं थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहता येईल.


VIDEO | अबुधाबीत आयपीएलचा सलामीचा सामना, Mumbai Indians VS Chennai Super Kings पहिली लढत