IPL 2020 : मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात काल झालेल्या लढतीनंतर पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तसेच सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स, तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता आणि चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. सर्व संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.
खास गोष्ट म्हणजे की, पहिल्या पाच स्थानांवर असणाऱ्या संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. तर मुंबईने आतापर्यंत चारपैकी दोन सामने जिंकेल आहेत, तर दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. असं असलं तरिही नेट रन रेटच्या आधारे मुंबई पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर बंगलोर पाचव्या क्रमांकावर, सनरायजर्स हैदराबाद सातव्या क्रमांकावर आणि पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी चेन्नई सुपर किंग्सचा संघ आहे.
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपमध्ये बदल
मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या स्थितीत बदलली आहे. मुंबई विरोधात 25 धावा करणारा पंजाबचा फंलदाज मयंक अग्रवाल 246 धावांसोबत ऑरेंज कॅप होल्डर बनला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पंजाबचा कर्णधार केएल. राहुल आहे. ज्याने 239 धावा केल्या आहेत. तसेच पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 8 विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज रबाडा आहे. ज्याने सात विकेट घेतले आहेत.
शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यांनतर ऑरेंज कॅपच्या स्थितीत बदल झाला आहे. जर फाफ डू प्लेसिसने 74 धावा काढल्या तर तो आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. तसेच चेन्नईचा वेगवान गोलंदाज सॅम करनने जर आणखी चार विकेट्स घेतले तर तो पर्पल कॅप होल्डर बनू शकतो. करनने तीन सामन्यांमध्ये आतापर्यंत पाच विकेट्स घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाब वर 48 धावांनी विजय; रोहित शर्माचं शानदार अर्धशतक