IPL 2020, RR vs CSK | आयपीएल 2020 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध हल्लाबोल केला. शारझानमध्ये खेळल्या जाणार्या या सामन्यात सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएल 2020 मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
सॅमसनने 32 चेंडूत एक चौकर 9 षटकारांसह 74 धावा केल्या. यासह सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थानकडून 2018 मध्ये जॉस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
तसेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. याआधी केएल राहुलने 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
सर्वात जलद अर्धशतक झळकावलेले फलंदाज
केएल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब)- 14 चेंडूत 50 धावा
युसूफ पठाण (कोलकात नाईट रायडर्स)- 15 चेंडूत 50 धावा
सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स)- 15 चेंडूत 50 धावा
सुरेश रैना (चेन्नई सुपरकिंग्ज)- 16 चेंडूत 50 धावा
ख्रिस गेल (रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर)- 17 चेंडूत 50 धावा