IPL 2020 Final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल 13 चा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर दिल्ली पहिल्यांदा आयपीएलचा किताब पटकावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, जुने रेकॉर्ड पाहता मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडताना दिसणार आहे.
तेराव्या सीझनच्या याआधी दिल्ली आणि मुंबई यांच्या तीन सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांमध्ये लीग स्टेजआधी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. पुढिल दोन सामन्यांमध्येही मुंबई इंडियन्स दिल्लीवर भारी पडल्याचं दिसून आलं आहे. लीग स्टेजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सकडून 9 विकेट्सनी पराभव झाला.
क्वालिफायर वनमध्ये तर मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडला होता. मुंबईच्या विरोधात 201 धावांच लक्ष्य गाठताना दिल्लीने 0 च्या स्कोअरवरच तीन विकेट्स गमावले होते. मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वनमध्ये दिल्लीचा 57 धावांनी पराभव करून फायनल्समध्ये जागा निर्माण केली.
दुबईमध्ये मुंबईचा रेकॉर्ड चांगला नाही
दिल्ली कॅपिटल्ससाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेत. मुंबईच्या तुलनेत दिल्लीच्या संघाने दुबईत आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 10 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विजय मिळवण्याच मुंबई सर्वात पुढे
आयपीएलच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये 27 वेळा लढती झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने 27 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 12 वेळा दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे.
संभाव्य संघ :
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिखर धवन, शिमरन हेटमायेर, अक्षर पटेल, मार्कस स्टोयनिस, रविचंद्रन अश्विन, रबाडा, एनरिक नॉर्खिया, प्रवीन दुबे.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव/क्रूणाल पांडया, कीरन पोलार्ड, जेम्स पैटिनसन/नाथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या :