Left-arm Bowlers in IPL 2022 : आयपीएलचा पंधरावा हंगाम अखेरच्या टप्यात आहे. क्वालिफायर 2 आणि फायनलच्या सामन्यानंतर आयपीएलचा हंगाम संपणार आहे.. आतापर्यंत 70 पेक्षा जास्त सामने झाले आहेत. यामध्ये डाव्या हाताच्या गोंलदाजांचा दबदबा राहिलाय. यामध्ये चार वेगावान भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. मोहसिन खान (Mohsin Khan), टी नटराजन (T Natarajan), यश दयाल (Yash Dayal) आणि खलील अहमद (Khaleel Ahmed) यांनी यंदा प्रभावी कामगिरी केली आहे. यामध्ये कोण विकेट पटकावण्यात आघाडीवर आहे तर कोण धावा रोखण्यात अव्वल आहे.. या गोलंदाजांनी आपापल्या संघासाठी भेदक गोलंदाजी केली आहे..  


मोहसिन खान : 
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसिन खानला सुरुवातीला संधी मिळाली नाही. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा मोहसिनने भेदक मारा केला. त्यानंतर मोहसीन लखनौ संघाचा नियमीत सदस्य राहिला... लखनौच्या अखेरच्या सामन्यापर्यंत मोहसिन मुख्य गोलंदाज झाला होता. मोहसिनने नऊ सामन्यात 14.14 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या आहेत. तर फक्त 5.96 चा इकॉनॉमी रेट राहिलाय. म्हणजेच, प्रतिषटक सहा धावाही दिल्या नाहीत.  


खलील अहमद : 
दिल्ली कॅपिटल्सच्या या वेगवान गोलंदाजाने 10 सामन्यात  19.68 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवनंतर दिल्लीसाठी खलीलने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.  8.04 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. म्हणजेच खलीलने प्रतिषटक 8 धावा दिल्या. 


टी नटराजन : 
सनराइजर्स हैदराबादच्या नटराजनला दुखापतीमुळे 11 सामन्यात खेळता आले.. या 11 सामन्यात त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. नटराजन संघातून बाहेर गेल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजीची धार कमकुवत झाल्याचे दिसून आले. नटराजन तीन सामन्यात बाहेर गेल्यानंतर हैदराबादचं प्लेऑफमधील आव्हानही संपले होते..


यश दयाल : 
फायनलमध्ये पोहचलेल्या गुजरातच्या यश दयालला उशीरा संघात स्थान मिळाले. यश दयालने आठ सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. गुजरातला जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा तेव्हा यश दयालने विकेट घेतली आहे.