Umran Malik : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 28 व्या सामन्यात हैदराबादने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादचा युवा गोलंदाज उम्रान मलिकच्या (Umran Malik) वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. उम्रानने सामन्यात चार षटकात 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने सामन्यातील आणि त्याच्या चार ओव्हरमधील अखेरची ओव्हर टाकताना एकही धाव न देता तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या या कामगिरीचा फॅन त्याच्याच संघातील दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) झाला आहे.
भुवनेश्वरने देखील सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत 22 रन देऊन 2 विकेट्स घेतले. दरम्यान सामन्यानंतर भुवनेश्वरने युवा गोलंदाज उम्रानचं कौतुक केलं. तो म्हणाला,"त्याला वेगवान गोलंदाजी करताना पाहून आनंद होतो. काल खेळपट्टीवर चेंडू स्वींग होत नव्हता. त्यामुळे उम्रानच्या वेगामुळे संघाला फायदा झाला."
0W0WWW उम्रानची तुफान गोलंदाजी
उम्रानने सामन्यात सर्वात आधी जितेश शर्माचा महत्त्वाचा विकेट घेतला. त्याने तीन षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली होती. त्यामुळे अखेरची आणि महत्त्वाची ओव्हर त्याला देण्यात आली. ज्यात त्याने ओडियन स्मिथ (13), वैभव अरोरा आणि राहुल चाहर या दोघांना शून्यावर बाद करत तंबूत धाडलं. तर अखेरच्या चेंडूवर देखील अर्शदीप सिंहला धावचीत केलं. अशाप्रकारे अखेरच्या षटकात एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या.
20 वी ओव्हर मेडन टाकणारे गोलंदाज
आयपीएलमध्ये 20 वी ओव्हर म्हणजे अगदी दमदार हिटींग दिसून येते. पण ही महत्त्वाची ओव्हरही मेडन अर्थात निर्धाव टाकणारे चार खेळाडू आहे. यातील एक नाव म्हणजे आज मेडन ओव्हर टाकणारा उम्रान मलिक आहे. त्याआधी 2008 मध्ये इरफान पठाण, 2009 मध्ये लसिथ मलिंगा आणि 2017 मध्ये जयदेव उनाडकटने ही कामगिरी केली आहे.
हे देखील वाचा-
- Umran Malik : 'श्रीनगर एक्सप्रेस' उम्रान मलिकची वेगवान कामगिरी; अखेरच्या षटकात एकही धाव न देता तिघांना धाडलं माघारी
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द
- DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय