SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते पराभूत झाले आहे. दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया...

Continues below advertisement

हैदराबाद विरुद्ध लखनौ, पिच रिपोर्ट 

आज सामना होणाऱ्या डीवाय पाटील मैदानाची खेळपट्टी अगदी संतुलित है. मागील 10 सामन्यात याठिकाणी पहिल्या डावाची सरासरी स्कोर 172 धावा आहे. आज सामना होणारे दोन्ही संघ नाणेफेर जिंकल्या गोलंदाजी घेण्याचीच दाट शक्यता आहे. कारण या ठिकाणी खेळल्या गेलेल्या बहुतांश सामन्यात प्रथम गोलंदाजी करणारे संघच यशस्वी ठरले आहेत. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाज दोघांकडून चांगली कामगिरी होत आहे. दरम्यान आजच्या सामन्यातही दव हा मोठा फॅक्टर ठरणार हे नक्की.

Continues below advertisement

हैदराबाद विरुद्ध लखनौ अशी असेल ड्रीम 11 (SRH vs LSG Best Dream 11)

विकेटकीपर- क्विंटन डि कॉक 

फलंदाज- राहुल त्रिपाठी, केन विलियमसन, केएल राहुल आणि आयुष बदोनी . 

ऑलराउंडर- वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पंड्या, आणि जेसन होल्डर. 

गोलंदाज-  भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, आवेश खान

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha