SRH vs RR : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबादचा संघ (RR vs SRH) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (MCA) आमने-सामने असणार आहेत. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हैदराबाद संघाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि राशिद खान आता संघात नसून राजस्थानच्या ताफ्यातून देखील काही स्टार खेळाडू निसटले आहेत. पण चहल, बोल्ट सारखे खेळाडू राजस्थान तर निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर सारखे खेळाडू हैदराबादमध्ये आले आहेत. तर आजच्या सामन्यात नेमके कोणते खेळाडू खेळू शकतात ते पाहूया...
'हे' खेळाडू आजच्या सामन्याला मुकणार
सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज सीन एबॉट आयपीएलच्या पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. तर इतर खेळाडू मात्र उपलब्ध असणार आहेत. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रीका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका 23 मार्चला संपली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रासी वॅन डेर ड्यूसन पहिला सामना खेळेल का? ही शंका आहे.
हैदराबादची संभाव्य अंतिम 11
अॅडेन मार्करम, अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
राजस्थानची संभाव्य अंतिम 11
जोस बटलर (विकेटकीपर), देवदत्त पडिकल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरोन हेटमायर, रियान पराग, जेम्स नीशम, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.
हे देखील वाचा-
- IPL 2022, SRH vs RR : राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध
- IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha