RR vs KKR : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 30 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR)हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत.  आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवला जाणार आहे. खेळपट्टीचा विचार करता याठिकाणी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत आहे. समोर असणारे लक्ष्य पार करण्यात यश येत आहे. यामागील दव हे एक मोठे कारण आहे. सायंकाळच्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवामुळे अडचण होत असल्याने फलंदाजी करणाऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.


राजस्थान विरुद्ध कोलकाता Head to Head


आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड असून त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राजस्थानला 11 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. 


आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  


कोलकाता - अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.


राजस्थान - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.


हे देखील वाचा-