SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा सामना प्रसिद्ध अशा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम दर्जाचे फलंदाज असून गोलंदाजीतही कसून गोलंदाजी करणारे दिग्गज आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान राजस्थान टेबल टॉपर असल्याने ते संघात अधिक बदल करतील याची शक्यता कमी आहे. तर आरसीबी कोणत्या खेळाडूंना संधी देईल हे पाहावे लागेल.
आज पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी याआधीच्या सामन्यात खेळलेल्या खेळीचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for RR vs RCB) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया...
राजस्थानचे संभाव्य अंतिम 11
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, नवदीप सैनी, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा.
बंगळुरुचे संभाव्य अंतिम 11
फाफ डु प्लेसीस(कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-
- IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?
- Womens World Cup 2022 : आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट 11, एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
- IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला 'या' विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha