Krunal Pandya Out Hardik Pandya: मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) चौथ्या सामन्यात लखनौकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने त्याचाच भाऊ आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केलं. दरम्यान या विकेटनंतर कृणाल, हार्दिक तसंत हार्दिकची पत्नी नताशा अशा साऱ्यांच्याच रिएक्शन्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
संघाला विजयाची गरज असताना हार्दिक कर्णधार म्हणून उत्तम खेळी करत होता. त्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान हार्दिकने 28 चेंडूत 33 धावा केल्या असतानाच कृणालच्या एका चेंडूवर हार्दिकने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडूचा बॅटशी नीट संपर्क झाला नसल्याने हार्दिक झेलबाद झाला. पण यावेळी कृणालने आनंद साजरा न करता एक स्मितहास्य दिल्याचं पाहायला मिळालं. तर हार्दीक मात्र कमालीचा निराश झाला होता.
चुरशीच्या सामन्यात गुजरात विजयी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौकडून अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावार लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर लखनौ संघाचा डाव कोसळला होता. आघाडीची फळी कोसळल्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार लखनौ संघाने सन्माजनक धावसंख्या उभारली. दीपक हुड्डाने आपल्या अर्धशतकी खेळीत 2 षटकार आणि सहा चौकार चोपले. तर आयुष बडोनी याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. बडोनीने 41 चेंडूत ताबडतोड 54 धावांची खेळी केली. गुजरातकडून शमी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. शमीने तीन विकेट घेतल्या. तर वरुण वरुण अरोन याने दोन विकेट घेतल्या. तर राशिद खानला एक विकेट मिळाली.
लखनौने दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली होती. सलामी फलंदाज शुभमन गिल शुन्य धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर आलेला विजय शंकरही सहा धावा काढून माघारी परतला. मॅथ्यू वेड आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला पण मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाले. हार्दिक पांड्या 33 आणि मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. मिलर आणि राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर आवेश खानने मोक्याच्या क्षणी मिलरला बाद केले. मिलरने 30 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवातिया आणि युवा अभिनव मनोहर यांनी गुजरतला विजय मिळवून दिला. लखनौकडून दुषंता चमिराने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर आवेश खान, क्रृणाल पांड्या, दीपक हुड्डा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध
- IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha