ICC T20 All-Rounder Ranking : टी20 विश्वचषकाआधी आयसीसीकडून टी20 क्रमवारी जारी करण्यात आली आहे. टी20 मध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादव याचं अव्वल स्थान कायम आहे. तर अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्याही टॉप 10 मध्ये आहे. गोलंदाजीत अक्षर पटेल याने मोठी झेप घेतली आहे. 2 जून 2024 पासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीकडून टी20 क्रमवारी जारी केली आहे. त्यामध्ये सूर्यकुमार यादव याचा फलंदाजीतील दबदबा कायम आहे. 


आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या खराब फॉर्मात आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत तो अष्टपैलूंच्या यादीत टॉप 10 मध्ये आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये वानंदु हसरंगा आणि शाकीब अल हसन संयुक्तरित्या अव्वल स्थानावर विराजमान आहेत. त्यांच्या नावावर 228 गुणांची नोंद आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या हा एकमेव खेळाडू आहे. पांड्या सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 185 गुण आहेत. गेल्या काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टी20 क्रिकेट खेळला नाही, त्यामुळे त्याच्या क्रमवारीत फारसा बदल झाला नाही. पण तो टॉप 10 मध्ये कायम आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी आहे. तर झिम्बाव्बेचा सिकंदर रजा चौथ्या क्रमांकावर आहे. मार्कस स्टॉयनिसही टॉप 10 मध्ये आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंह याने टॉप 10 मध्ये एन्ट्री केली आहे. 


फलंदाजीत सूर्याचा जलवा 


भारताचा मिस्टर 360 म्हणजेच सूर्यकुमार यादव टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नावावर 961 गुण आहेत. तर 802 गुणांसह इंग्लंडचा फिलिप सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. रिझवानच्या नावावर 781 तर बाबरच्या नावावर 761 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. तर भारताचा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल सहाव्या क्रमांकावर आहे. यशस्वीच्या नावावर 741 गुण आहेत. 


गोलंदाजीत कोण कोण ?


टी20 मधील गोलंदाजामध्ये इंग्लंडच्या आदिल रशिद यानं कब्जा मिळवला आहे. आदिल रशिदच्या नावावर 716 रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लंकेचा वानंदु हसरंगा आहे. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा अक्षर पटेल 660 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.  रवि बिश्नोई 659 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. अर्शदीप सिंह 19 व्या क्रमांकावर आहे.  


आणखी वाचा :


सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं