IPL 2024 : आयपीएल 2024 अंतिम टप्प्यात आहे. प्लेऑपसाठीचे दोन संघ निश्चित झालेत. आरसीबीने दुसऱ्या टप्प्यात शानदार कमबॅक केलेय. लागोपाठ पाच सामने जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना आता चेन्नईविरोधात भिडायचं आहे. हा सामना आरसीबीसाठी करो या मरो असाच असेल. 18 मे रोजी होणाऱ्या या सामन्याला फायनलचे स्वरुप आलेय. स्टार स्परोट्स्, जिओ सिनेमा यांनी यासाठी विशेष तयारी केली आहे. 18 मे रोजी काय होणार.. यासाठी वेगवेगळे दावे केले जात आहे. पण चाहत्यांना काय वाटतेय...हेही तितकेच महत्वाचं आहे. 


आरसीबीसाठी यंदाचा हंगाम सरासरीच राहिलाय. त्यांना 13 सामन्यात सहा विजय मिळवता आलेत. 12 गुणांसह आरसीबी सहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला चेन्नईचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. विराट कोहलीच्या आरसीबीला चेन्नईविरोधातील सामना महत्वाचा असणार आहे. 


18 मे आरसीबीची फायनल  


आरसीबीचे सध्या 12 गुण आहेत. गुणतालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहे. आता अखेरचा सामना जिंकून प्लेऑपमध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे. पण जर या सामन्यातील एक चूक त्यांना महागात पडू शकते. विराट कोहली की धोनी.. प्लेऑफमध्ये कोण खेळणार.. याकडे आयपीएल प्रेमींचं लक्ष लागलेय. चेन्नईविरोधात आरसीबीला फक्त जिंकायचेच नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवायचाय. 


आरसीबीसाठी समीकरण कसे आहे ?


आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.  चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. 


चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. 


आरसीबीचा सलग पाच सामन्यात विजय - 


आयपीएल 2024 च्या पहिल्या हापमध्ये आरसीबीची कामगिरी अतिशय लाजीरवाणी झाली होती. आरसीबीला पहिल्या आठ सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला होता. आरसीबीचा संघ गुणतालिकेत तळाला होता. पण दुसऱ्या हाफमध्ये आरसीबीने शानदार कमबॅक केले. आरसीबीने लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. आरसीबीचा संघ सध्या आता सहाव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर प्लेऑफचे तिकिटही मिळू शकते.