Cristiano Ronaldo: इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मॅनचेस्टर युनाईटेडनं (Manchester United) आपला 16 वा विजय मिळवला आहे. सोमवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात मॅनचॅस्टर युनाईटेडनं ब्रेंटफोर्डला (Brentford) 3-0  च्या फरकानं पराभूत केलं. मॅनचॅस्टर युनायटेडच्या विजयात ख्रिस्तियानो रोनाल्डो महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं उत्कृष्ट पेनल्टी गोल केला. ईपीएलच्या सध्याच्या हंगामात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा 18 वा गोल आहे.


महत्वाचं म्हणजे, ईपीएलच्या या हंगामानंतर ख्रिस्तियानो रोल्डानं मॅनचॅस्टर युनाईटेड संघाची साथ सोडेल, अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, ब्रेन्टफोर्डविरुद्ध सामन्यानंतर रोनाल्डोनं मॅनचॅस्टर युनाईटेडसह 12 महिने सोबत राहण्याचे संकेत दिले. या सामन्यानंतर त्यानं कॅमेऱ्यासमोर मी संपलो नाही, असं म्हटलं आहे. 


पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रोफेशनल फुटबॉलच्या इतिहासात सर्वात जास्त गोल करणारा फुटबॉलर आहे. रोनाल्डोनं मागच्या महिन्यात जोसेफ बीकन यांचा विक्रम मोडला होता. जोसेफ बीकननं फीफा रेकॉर्ड्सनुसार त्यांनी एकूण 805 गोल केले आहेत.


क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत. पोर्तुगालच्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे. रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताही टॅटू गोंदवला नाही. तो वर्षातून अनेकवेळा रक्तदान करतो. त्यामुळे त्याने ही खबरदारी घेतलीय. क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत. रोनाल्डो 18 वर्षाचा असताना इंग्लिश फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर युनायटेडने त्याला 1.7 कोटी डॉलर्सला करारबद्ध केलं होतं. त्यानंतर रोनाल्डोने कधीही मागे बघितलं नाही. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू अशी ख्याती असलेला पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो वयाच्या 36 व्या वर्षात पदार्पण करत आहे.


हे देखील वाचा-