IPL 2023 : मुंबईचा युवा गोलंदाज आकाश मधवाल सध्या चर्चेत आहे. हैदराबाद आणि लखनौ या दोन सामन्यात मधवाल याने 9 विकेट घेत सर्वांची मने जिंकली आहे.  जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत आकाश मधवाल भेदक मारा करत आहे. अनेकांनी आकाश मधवालची तुलना जसप्रीत बुमराह याच्यासोबत केली. याबाबत आकाश मधवाल याला प्रश्न विचारला. त्यावर आकाश म्हणाला की, संघाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतो.. मी बुमराहाची रिप्लेसमेंट नाही.  पण प्रत्येकवेळी मी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. 


 मधवाल म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून मी खूप सराव करत होतो.त्याशिवाय संधीची वाट पाहत होतो. मी इंजिनीअरिंग केले आहे, क्रिकेट ही माझी आवड आहे आणि 2018 पासून मी याची वाट पाहत आहे. जेव्हा आम्ही नेटमध्ये सराव करतो तेव्हा व्यवस्थापन आमच्यावर लक्ष्य देते आणि आम्ही आमचे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची आशा आहे आणि चॅम्पियन म्हणून शेवटपर्यंत पोहोचू इच्छितो. निकोलस पूरनची विकेट माझ्यासाठी सर्वात आनंददायक होती.


रोहित भैयामुळेच यशस्वी ठरलो - आकाश मधवाल


मुंबई इंडियन्सने आकाश मधवाल याची मुलाखत आपल्या संकेतस्थळावर पोस्ट केली आहे. यामध्ये आकाश त्याला रोहित आणि मुंबईकडून कशी मदत मिळाली, याबाबत सांगतोय. आकाश मधवाल म्हणाला की,  "माझ्या पहिल्या बॉलच्या वेळी मी जरा नर्व्हस झालो होतो. पण रोहित भैयाने मला त्यानंतर लगेचच शांत केले. त्याने मला माझ्या ताकदींवर लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करायला सांगितले. त्याने मला माझ्या ताकदींवर लक्ष केंद्रित करून आतापर्यंत जे काही करतोय तेच करत राहा असे सांगितले. पुढच्या सामन्यांसाठी मी प्रत्येक वेळी १०० टक्के कामगिरी करणार आहे."


स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली तसतसे मधवाल अत्यंत वेगाने शिकत गेला. आरसीबीविरूद्ध विसाव्या ओव्हरमध्ये प्रभावी गोलंदाजी करताना त्याने फक्त सहा धावा दिल्या. त्यानंतर जीटीविरूद्ध मधवाल प्रभावी बदली खेळाडू म्हणून आला आणि त्याने वृद्धिमान साहा, शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर या धोकादायक खेळाडूंना बाद केले. त्याच्या ३/३१ या कामगिरीमुळे एमआयला विद्यमान गुजरात टायटन्सला हरवणे शक्य झाले. पॉवरप्ले आणि डेथ अशा दोन्ही प्रकारांमधील गोलंदाजीतील त्याची वैविध्यपूर्णता दाखवल्यानंतर मधवाल म्हणाला की, "या सामन्यापूर्वीची माझी जबाबदारी शेवटच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची होती. पण रोहित भैयाने मला नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना सामन्यापूर्वी पहिल्याच दिवशी सांगितले की, मी पॉवरप्ले ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायची आहे. त्याने मला तयार राहायला सांगितले आणि सुदैवाने संधी मिळाल्यावर मला ती ताब्यात घेता आली."