Harry Brook Big Statement After Century : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील आयपीएलच्या 16व्या हंगामातील 19 वा सामना पार कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) स्टार सलामीवीर हॅरी ब्रूकने (Harry Brook) आपल्या बॅटनं वादळी खेळी केली. हॅरी ब्रूकनं तुफान शतकी खेळी (Harry Brook First Century in IPL 2023) केली.
शतकी खेळीनंतर हॅरी ब्रूकचं मोठं वक्तव्य
हॅरी ब्रूकनं या सामन्यात 55 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकार ठोकत 100 धावा केल्या. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिलं शतक (First Century in IPl 2023) हॅरी ब्रूकने (Harry Brook in IPL) ठोकलं आहे. दरम्यान, मॅचनंतर प्रतिक्रिया देत हॅरीनं टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. आपल्या टीकाकारांना योग्य प्रकारे गप्प केल्याचं ब्रूकनं सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी टीका करणाऱ्या भारतीय चाहत्यांना म्हणाला...
दमदार शतकी कामगिरी करणाऱ्या हॅरी ब्रूकने सामन्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आजची रात्र अभूतपूर्व होती. मला खूप मजा आली. मी स्वतःवर थोडा दबाव आणत होतो. तुम्ही सोशल मीडियावर जाता आणि तिथे लोक तुमच्याबद्दल गप्पा मारत असतात. अनेक भारतीय चाहते आहेत जे आजच्या माझ्या कामगिरीवर खूश होऊन मी चांगलं खेळलो असं म्हणतील. पण काही दिवसांपूर्वी त्याचं चाहत्यांनी मला झोडपून काढत माझ्यावर टीका केली होती. मला आनंद झाला की मी त्या टीका करणाऱ्यांना आजच्या खेळीनंतर गप्प करू शकलो"
हॅरी ब्रूकनं ठोकलं यंदाच्या हंगामातील पहिलं शतक
आयपीएल 2023 मधील पहिलं शतक ठोकत हॅरी ब्रूकनं त्यांची ताकद दाखवून दिली आहे. हॅरी ब्रुकला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 साठी 13.25 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलं. मात्र पहिल्या तीन सामन्यांमध्ये हॅरीची बॅट चालली नव्हती. त्यानंतर आता हॅरी ब्रूकने शंभर नंबरी कामगिरी करत टीका करणाऱ्यांना तळपत्या बॅटने उत्तर दिलं आहे.
नेटकऱ्यांनी केलं होतं हॅरी ब्रुकला ट्रोल
इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुक (Harry Brook) याच्यासाठी हैदराबाद संघाने तब्बल 13.25 कोटी खर्च केले. बक्कळ पैसा खर्च केल्यामुळे संघाची सीईओ काव्या मारन सोशल मीडियावर ट्रोली झाली होती. नेटकऱ्यांनी हॅरी ब्रूकलाही मीम्स मीम्सही शेअर करत केलं होतं.
पाहा मीम्स :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Harry Brook IPL 2023 : हैदराबादला चुना? 13.25 कोटींच्या खेळाडूकडून 2 सामन्यांत फक्त 16 धावा