लखनौ : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024) कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) विरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये 10 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये मुंबईला 10 पैकी 3 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटसनं पराभूत केलं. या मॅचनंतर बीसीसीआयनं (BCCI) मुंबई इंडियन्स वर मोठी कारवाई केली आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) एका चुकीसाठी दोषी धरत त्याच्यावर 24 लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईच्या इतर खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख  रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळं मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेट प्रकरणी दुसऱ्यांदा कारवाईला सामोरं जावं लागत आहे. दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यानं हार्दिक पांड्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  हार्दिक पांड्याकडून म्हणजेच मुंबईकडून अशी चूक पुन्हा झाल्यास कॅप्टन म्हणून त्याच्यावर एक सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.


बीसीसीआयनं ही कारवाई करताना म्हटलं  की आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून ही चूक दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळं 24 लाख रुपयांचा दंड हार्दिक पांड्याला ठोठावण्यात आला आहे. 


मुंबई इंडियन्सकडून दुसऱ्यांदा ही चूक झाल्यानं केवळ हार्दिक पांड्याला दंड करण्यात आलेला नाही  तर संघातील इतर खेळाडूंना देखील दंड करण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरसह सर्व खेळाडूंना दंड करण्यात आला आहे. सर्व खेळाडूंना सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के रक्कम यात जी कमी असेल तितक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.


मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरुच


मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमधील पराभवाची मालिका काही थांबण्याचं चित्र दिसत नाही. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलसाठी नेतृत्त्वाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. हार्दिक पांड्या गुजरातच्या संघातून मुंबईच्या संघात परतल्यानंतर त्याला कॅप्टन म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मुंबईला काल झालेल्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसकडून पराभव स्वीकारावा लागला. लखनौ सुपर जाएंटसनं गुणतालिकेत या विजयासह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. 


मुंबई इंडियन्सच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये सांघिक कामगिरीचं दर्शन घडवता आलेलं नाही. आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला 2020 नंतर विजेतेपद मिळालेलं नाही. 


संबंधित बातम्या : 



 MI vs LSG : बुमराह असूनही ही स्थिती, हार्दिक पांड्याच्या चुका, इरफान पठाणकडून मुंबईच्या खराब कामगिरीची पोलखोल