Hardik Pandya On Mumbai Indians : हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात परतला आहे. आज मुंबई, गुजरात आणि आयपीएलकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली. मुंबईच्या ताफ्यात परतल्यानंतर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओत हार्दिक पांड्याने केलेले वक्तव्य चर्चेत आहे. मुंबईमध्ये परत येण्याचे कारण हार्दिक पांड्याने सांगितलेय. मी पुन्हा घरी आल्यासारखे वाटतेय, असे हार्दिक पांड्या म्हणाला. मुंबई इंडियन्स माझ्यासाठी एक घरच आहे, असेही पांड्या म्हणाला. 


हार्दिक पांड्याने व्हिडीओत काय म्हटलेय ?


मी परत आलोय.... रोहित, बुमराह, सूर्या, ईशान, पोलार्ड, मलिंगा.. चला सुरु करुया. 


मुंबईमध्ये परत आल्यानंतर आनंद वाटतोय. त्याची कारणेही खूप आहेत. मुंबई इंडियन्स माझ्यासाठी एखाद्या घरासारखेच आहे. 2015 मध्ये माझं क्रिकेटमधील करियर मुंबईमधूनच सुरु झालं. 2013 मध्ये त्यांनी मला नोटीस केले होते. दहा वर्षांचा कार्यकाळ उलटला. मुंबईने मला खूप काही दिले. आकाश अंबानी आणि कुटुंब नेहमीच माझ्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत राहिलं. 


पलटन तूम्ही मला पहिल्यांदा सपोर्ट केले होते. सर्व आठवणी माझ्यासाठी खास आहेत, त्या नेहमीच ह्दयाच्या जवळ आहेत. एक संघ म्हणून आपण आतापर्यंत इतिहास रचलाय, यापुढेही तशीच कामगिरी करण्यासाठी तयार आहे.  माझ्या हार्दिक स्वागतासाठी धन्यवाद!














 
आयपीएलमध्ये हार्दिकचे धमाकेदार करियर - 


हार्दिक पांड्याचे आयपीएलमध्ये शानदार करियर राहिलेय. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. मुंबई आणि गुजरात संघासाठी हार्दिक पांड्या आयपीएलच्या मैदानात उतरला. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये 145.86 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.38 च्या स्ट्राईक रेटने 23.09 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीतही 53 विकेट घेतल्या आहेत.