hardik pandya Funny Video: हार्दिक पांड्याला यंदाच्या हंगामात अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये हार्दिकला प्रभावित करता आले नाही. हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. पण आता हार्दिक पांड्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. हार्दिक पांड्यासारखा दिसणारा एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत. पांड्याला ट्रोल करण्यासाठी नेटकऱ्यांनी आता त्याच्या व्हिडीओचा वापर केलाय. हार्दिक पांड्यासारखा दिसणारा व्यक्ती एका लग्नात ढोल वाजवत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. काहींनी हा व्हिडीओ पोस्ट करत हार्दिक पांड्यावर आता लग्नात ढोल वाजवण्याचं काम राहिलेय, असेही म्हटलेय.
सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत हार्दिकसारखा दिसणारा एक व्यक्ती ढोल वाजवताना दिसत आहे. ही व्यक्ती हुबेहुब भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासारखी दिसत आहे. व्हिडिओमध्ये या व्यक्तीने बँड वाजवणाऱ्याचे कपडे घातले आहेत. तो व्यक्ती ढोल वाजवण्यासाठी लग्नाच्या मिरवणुकीसोबत फिरत आहे. या व्यक्ती सेम टू सेम हार्दिक पांड्यासारखा दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींना वाटतं की हा व्हिडीओ एडिट केलेला आहे, तर काहींना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हा हार्दिक पांड्याचा खरा लूक आहे की आणखी कोणाचा. यूजर्स या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केले जात आहेत. एका युजरने मस्करीत म्हटले की - 'हार्दिक पांड्या त्याच्या योग्य ठिकाणी आहे'. दुसऱ्या यूजरने लिहिले- 'मी या आधी कुठेतरी य़ाला पाहिले आहे.'