Irfan Pathan on Hardik Pandya : माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावर निशाणा साधला आहे. हार्दिक पांड्यासोबत सुपरस्टार सारखं वर्तन करण्याची गरज नाही. त्याला जास्त महत्व देऊ नका, अशी मागणी इरफान पठाण यानं बीसीसीआयकडे केली आहे. हार्दिक पांड्याला यंदाच्या हंगामात अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्या गोलंदाजी, फलंदाजी आणि नेतृत्वात फेल ठरला आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत महागडी गोलंदाजी केली, तर फलंदाजीतही मोठी खेळी करता आलेली नाही. टी 20 विश्वचषकासंदर्भात बोलताना इरफान पठाण यानं हार्दिक पांड्यावर निशाणा साधलाय. त्याला सुपरस्टार सारखं वागवण्याची गरज नाही. हार्दिक पांड्यानं आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकलेला नाही. आयपीएलच्या कामगिरीवर आपण भ्रमित होऊन चालणार नाही, असेही इरफान पठाण म्हणाला. 


हार्दिकला महत्व देण्याची गरज नाही - 


भारताचा माजी अष्टपैलू खेलाडू इरफान पठाण यानं पुन्हा एकदा रोखठोख वक्तव्य केलेय. स्टार स्पोर्ट्सचा प्रेस रूम शो, टिकट टू वर्ल्ड कपमध्ये बोलताना इरफाननं बीसीसीआयकडे विनंती केली आहे. हार्दिक पांड्याला भारतीय संघानं तितकं महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मते हार्दिक पांड्याला आतापर्यंत जितकं महत्व दिलेय, तितकंच महत्व द्यावं. त्याला सुपरस्टारसारखं महत्व देऊ नयं. कारण, अद्याप आपण विश्वचषक जिंकलेला नाही. जर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं प्रभावी कामगिरी करायला हवी. हार्दिक पांड्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही, असे इरफान पठाण म्हणाला.


आयपीएल अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फरक - 


आपण फक्त क्षमतेबाबत विचार करत आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भ्रमित होत आहे. दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. हार्दिक पांड्याला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आलेली नाही. त्याला तितकं महत्व देण्याची गरज नाही. हार्दिक पांड्या कोणताही मोठी स्पर्धा जिंकलेला नाही. आपण संघाला महत्व दिलं पाहिजे, ऑस्ट्रेलिया मागील अनेक वर्षांपासून संघाला महत्व देत आहे. कुणाला सुपरस्टार करण्याऐवजी संघाबाबत विचार करायला हवा. देशासाठी खेळणारा प्रत्येकजण सुपरस्टार आहे, असे इरफान म्हणाला.   


विश्वचषक आला की वेगवान गोलंदाज अन् फिनिशर याबाबत विचार केल्यास खंत वाटते. आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.  मधल्या षटकांमध्येही आम्ही चांगली कामगिरी केली. रवींद्र जडेजाचा सातव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून विचार करत असाल तर आपल्याला एका चांगल्या फिनिशरची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्ट्राईक रेटचा विचार केला तर त्याचे आकडे तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिनिशर म्हणून आपल्याला चांगल्या खेळाडूची गरज आहे. हार्दिक पांड्याला अद्याप तो प्रभाव पाडता आलेला नाही.