GT vs PBKS IPL 2025 : गुजरातच्या बालेकिल्ल्यात पंजाब किंग्जचा बोलबाला! रोमांचक सामन्यात श्रेयस अय्यरच्या संघाचा 11धावांनी विजय
GT vs PBKS Match Updates IPL 2025 : आयपीएल 2025 चा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

पार्श्वभूमी
Gujarat Titans vs Punjab Kings Update IPL 2025 : आयपीएल 2025 या हंगामात पंजाब किंग्ज संघ पूर्णपणे नवीन रंगात रंगला आहे. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघाने गुजरातच्या...More
आयपीएल 2025च्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला. एकेकाळी असे वाटत होते की गुजरातचा संघ 244 धावांचे लक्ष्य सहज गाठेल, पण शेवटी पंजाब किंग्जने हा सामना जिंकला, ज्यामध्ये विजयकुमार वैशकने मोलाचा वाटा उचलला. विजयकुमार वैशकने 15व्या आणि 17व्या षटकात प्रत्येकी पाच धावा दिल्या आणि आवश्यक धावगती 13 वरून 17 पर्यंत नेली. पंजाब किंग्जने प्रथम खेळल्यानंतर 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला फक्त 232 धावा करता आल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने 74, जोस बटलरने 54 आणि शर्फान रुदरफोर्डने 46 धावा केल्या.
अर्शदीप सिंगने साई सुदर्शनला आऊट करून गुजरातला दुसरा धक्का दिला आहे. त्याने तो 41 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. 13 षटकांनंतर धावसंख्या 152/2 आहे.