UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओकडून लवकरच खातेदारांना यूपीआय अन् एटीएमद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.याचा फायदा कोट्यवधी खातेदारांना होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित डावरा एएनआयला दिलेल्या माहितीनुसार मे किंवा जून मध्ये ही नवी सुविधा लागू करण्यात येईल.

ईपीएफओ येत्या काळात यूपीआयच्या माध्यमातून फंड काढण्यासंदर्भातील सुविधा देणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं एनपीसीआयच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. त्यामुळं यूपीआयच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची किंवा काढण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
डावरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएफओ सदस्य तातडीनं 1 लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढून त्यांच्या बँक खात्यात वर्ग करु शकतात. याशिवाय यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासली जाऊ शकेल.
ईपीएफओनं 120 हून अधिक डेटाबेसला इंटिग्रेट करुन प्रक्रिया डिजीटल करण्यात प्रगती केलीय. क्लेम प्रोसेसिंगचा वेळ कमी करुन 3 दिवसांवर आणला. पीएफ काढण्यसाठी 95 टक्के क्लेम ऑटोमेडेड आणि सोपी करण्यावर काम सुरु आहे. यामुळं डिसेंबर 2024 नंतर पीएफ खातेदारांना कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल.